भाजपचे खासदार धनंजय महाडीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भाजपाचे खासदार धनंजय महाडीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.