‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात क्रमांक पटकावणाऱ्या शाळा बक्षिस वितरण

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात नागपूर जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बक्षिसं देण्यात आली. देवगिरी या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशीष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

 

        Image