डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रीय खेल पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खेल पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान बुद्धिबळाचा जगज्जेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा अ‍ॅथलीट प्रवीण कुमार, आणि नेमबाज मनु भाकर या चौघांना प्रदान करण्यात आला. ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं .

 

क्रीडाप्रशिक्षकांना देण्यात येणारा द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्यासह ५ जणांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातला नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि पॅरा अथलीट सचिन खिलारी यांच्यासह ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं.

 

ज्येष्ठ खेळाडू सुचा सिंग आणि दिव्यांग जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठ खेलो इंडीया क्रीडास्पर्धांमधे सर्वाधिक पदकं मिळवणाऱ्या चंडीगढ विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद करंडक राष्ट्रपतींनी प्रदान केला.