दिशा सालियान मृत्यू प्रकरणी किती दिवस चौकशी ?

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आणखी किती दिवस चौकशी करणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं आज मुंबई पोलिसांना विचारला. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर, तिच्या मृत्यूला ५ वर्षं उलटून गेली आहेत आणि तिनं आत्महत्या केली, की तिचा खून झाला, एवढंच पोलिसांना शोधून काढायचं आहे, असं मत न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांनी मांडलं. दिशा सालियान हिच्या वडिलांनी, तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.