राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

राज्यसभेचं कामकाज आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ वरच्या चर्चेनं सुरु झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केवळ अल्पकालीन लोनानुनयी निर्णय घेतले नसून मध्यम आणि दीर्घकालीन विचारांवर काम केल्याचं वायएसआरसीपीचे एस. निरंजन रेड्डी यांनी सांगितलं. तर, हा अर्थसंकल्प लोकविरोधी आणि संघराज्य विरोधी असल्याचा आरोप सीपीआयचे सदस्य पी संतोष कुमार यांनी केला. राजदचे ए डी सिंह यांनी देशातल्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला, आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडे योग्य लक्ष पुरवण्यात आलं नसल्याचं ते म्हणाले.