गेल्या दहा वर्षात भारताने आपली कार्यक्षमता, वेग आणि अचूक व्यवस्थापन यांच्या बळावर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतकार्य आयुक्त आणि आपत्ती प्रतिसाद दलांच्या परिषदेला संबोधित करत होते.
विविध प्रकारच्या संकटांमध्ये बचावकार्य करण्यासाठी जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन योजना असणं महत्त्वाचं आहे, असं सांगताना विविध राज्यांच्या मदतकार्य आयुक्तांना पुढच्या ९० दिवसात प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करण्याच्या सूचनाही शहा यांनी दिल्या. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे आज संपूर्ण जगाला संकटं भेडसावत आहेत.
गेल्या दहा वर्षांत मात्र, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF आणि आपत्ती प्रतिरोधक कोअलिशन CDRI यांच्या बळावर गेल्या दहा वर्षात भारत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात जगाचं नेतृत्व करत आहे, असं ते म्हणाले.