कृषी क्षेत्राला विना अडथळा कर्ज देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

कृषी क्षेत्राला विना अडथळा कर्ज देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. यासंदर्भात सर्व सरकारी बँका, नाबार्ड आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत केंद्रीय वित्त सेवा सचिव एम. नागाराजू यांनी हे निर्देश दिले. या कर्जवितरणासाठी दिलेली उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षात पूर्ण होतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.