November 18, 2025 9:14 AM

printer

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं काल श्रीनगरमधून जसीर बिलाल वनी याला अटक केली. या बॉम्बस्फोटासाठी तांत्रिक मदत जसीर वनी यानं केल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. त्यानं ड्रोन्स विकसित करून बॉम्बस्फोटापूर्वी त्या ठिकाणी मारा केला, असं तपास यंत्रणेनं म्हटलं आहे.

 

या प्रकरणात वनीनं उमर नबीची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्रिय सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे. या कटाचा तपास करण्यासाठी विविध बाजूंनी तपास केला जात असून, वेगवेगळ्या राज्यात शोधमोहीम राबवून या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींचा शोध घेतला जात असल्याचं एनआयनं स्पष्ट केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.