अहिल्यानगरमधल्या १११ शाळांमधे इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचं लोकार्पण

‘डिजिटल स्कूल’ या संकल्पनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या १११ शाळांमधे इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचं लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आलं. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच जिल्ह्यातले गटविकास अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनी शिंदे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला.