महसूल विभागाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइटवरुन डिजिटल स्वरुपात सातबारा काढता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. डिजिटल स्वाक्षरीने मिळणारा गावनमुना सातबारा, आठ अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशासकीय तसंच बँकिंग, कर्जप्रक्रिया, न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे वैध असतील. यासाठी १५ रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.
Site Admin | December 4, 2025 7:02 PM | Digital Satbara
आता मिळणार ‘डिजिटल सातबारा’