डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळाचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत तिसऱ्या राष्ट्रीय ई विधान परिषदेला संबोधित करत होते. कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायपालिकेेने डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढली आहे, असं रिजिजू म्हणाले. या परिषदेत सर्व राज्यांच्या विधिमंडळांचे सचिव, नोडल विभागाचे सचिव यांच्यासह शंभर प्रतिनिधी उपस्थित होते.
Site Admin | October 30, 2025 3:55 PM | Digital India
न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळाचं ‘डिजिटायजेशन’