‘डिजिटल अटक’ या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची दखल

डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे. सायबर चोरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट आदेशांचा वापर करून त्यांना डिजिटल अटकेत ठेवलं आणि एक कोटींहून अधिक रुपये उकळल्याचा आरोप या महिलेने केला होता. बनावट आदेशांचा वापर करून अशा प्रकारे होणारी आर्थिक फसवणूक न्यायव्यवस्थेवरच्या नागरिकांच्या विश्वासाला धक्का देणारी ठरू शकते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.