डिजिटल अटकेच्या नावाखाली मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे ५८ कोटी रुपये लंपास करणाऱ्या ३ आरोपींना सायबर पोलीसांनी अटक केली आहे. फसवणुकीच्या या प्रकारादरम्यान आरोपींनी संबंधित व्यावसायिकासह त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉलवरून धमकी दिली होती. धमकीच्या धाकामुळं या दाम्पत्यानं १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर दरम्यान आरोपींनी मागणी केलेले ५८ कोटी रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले होते. पण फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या दाम्पत्यानं सायबर पोलीस विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत सायबर पोलिसांनी आरोपींचा मग काढत त्यांना अटक केली. या आरोपींची कसून चौकशी सुरु असल्याचं सायबर विभागानं कळवलं आहे.
Site Admin | October 17, 2025 3:55 PM | Digital Arrest
डिजिटल अटकेच्या नावाखाली व्यावसायिकाचे ५८ कोटी लंपास, तीघांना अटक
