डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

धुळे महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

धुळे महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं माजी आमदार फारूक शाह यांनी आज जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक आज धुळे इथं झाली. यात महानगरपालिकेच्या सर्व ७४ जागा लढवण्याचा निर्णय झाला. महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.