डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 19, 2024 6:26 PM

printer

धुळे दोंडाई शहरातील नागरीकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचं आवाहन

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात आज धार्मिक मिरवणुकीवेळी अचानक झालेल्या दगडफेकीच्या प्रकाराने काही काळ तणाव सदृष्य स्थिती निर्माण झाली. प्राप्त माहिती नुसार, आज सकाळी दोंडाईचा शहरातून धार्मिक मिरवणुकीला प्रारंभ झाला, सदर मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरुन जात असतांना एका ठिकाणी मिरवणुकीत वाद निर्माण होवून दगडफेक झाल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करीत जमावाला शांततेचे आवाहन केले आणि गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनेची माहिती मिळताच दोंंडाईचात अतिरिक्त पोलिस बळ रवाना केले आणि परिस्थिती आटोक्यात आणली असून कोणीही कायदा सुव्यवस्थेला बाधा होईल असे कृत्य केल्यास अतिशय कठोर अशी कारवाई केली जाईल, असा इशारा एका व्हीडीओ संदेशाव्दारे जारी केला आहे. आमदार जयकुमार रावल यांनी देखील दोंडाईचा शहरातील सर्व नागरीकांनी शांतता पाळावी, कोणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केलेले आवाहन..

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.