धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी, तसंच भाजपाच्या काही नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित भाजपा उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही आज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागं घेतले.
अमरावती जिल्ह्यात काल २८ जणांनी माघार घेतली. यामध्ये नगराध्यक्षांच्या ६, तर नगरसेवकपदाच्या २२ उमेदवारांचा समावेश आहे.
आपल्या पक्षानं, आमच्या नेत्यांनी विकासासाठी काय कामं केली ते सांगा आणि कामाला लागा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नगराध्यक्ष आणि इतर उमेदवारांची पार्श्वभूमी जाणून घेऊनच मतदान करायला मतदारांना सांगा, असं ते म्हणाले.
अमरावती जिल्ह्यात काल २८ जणांनी माघार घेतली. यामध्ये नगराध्यक्षांच्या ६, तर नगरसेवकपदाच्या २२ उमेदवारांचा समावेश आहे.