डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताच्या धिनिधी देसंगुचा चारशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत नवा विक्रम

बहारीन इथं आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या धिनिधी देसंगु  हिने चारशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. धिनिधीने हे अंतर चार मिनिट २१ सेकंद ८६ मिनीसेकंदात पार करत अंतिम फेरीत पाचवं स्थान पटकावलं. तसंच स्वतःचाच चार मिनिट २४ सेकंद ६० मिनीसेकंदाचा विक्रम मोडीत काढला. याच स्पर्धेत भारताच्याच अदिती हेगडेनं चारशे मीटरचं अंतर चार मिनिट ३२ सेकंदात पार करत सातवं स्थान पटकावलं.  

 

पुरुषांच्या जलतरण स्पर्धेत भारताच्या नितीशसाई हरिनाथ याने ५० मीटरचं अंतर २३ सेकंद ७२ मिनीसेकंदात पूर्ण केलं. तर दक्षन  शशीकुमार यानं चारशे मीटर अंतर चार मिनिट ८७ मिनीसेकंदात पार केलं.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.