October 13, 2025 3:14 PM

printer

उत्पादन केंद्रीत अर्थव्यवस्था असेल तरच भारत विकसित देश बनू शकतो- केंद्रीय शिक्षण मंत्री

उत्पादन केंद्रीत अर्थव्यवस्था असेल तरच भारत विकसित देश बनू शकतो असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. विकसित भारत बिल्डथॉनचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते. 

 

शालेय स्तरावर ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ ही हॅकेथॉन स्पर्धा, आज रात्री ११ वाजेपर्यंत होणार आहे. देशभरातल्या शाळांमधून इयत्ता ६वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य दाखवण्यासाठी सक्षम बनवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

यावर्षीची स्पर्धा, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार संकल्पनांवर आधारित आहे. या स्पर्धेतील, राष्ट्रीय स्तरावरील १०, राज्यस्तरावरील १०० आणि जिल्हास्तरावरील १ हजार विजेत्यांना एकंदर १ कोटी रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.