धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते.
Site Admin | November 22, 2025 7:13 PM | dharashiv accident
धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ रस्ते अपघातात ४ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी