धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा तिसरा टप्पा खुला

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा तिसरा टप्पा आज सकाळी सात वाजल्यापासून खुला झाला. सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत हा टप्पा वाहतुकीसाठी खुला राहील. प्रकल्पातल्या उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी तो शनिवार आणि रविवारी बंद राहील.उत्तर मार्गिकेवरच्या हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतच्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या या टप्प्याची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. मुंबईतली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी किनारी रस्ता प्रकल्प मोलाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.