October 19, 2025 8:53 AM | Dhanteras | Diwali

printer

देशभरात धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा

राज्यासह देशभरात काल धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त देशवासियांना काल शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात सर्वांच्या  आनंद, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही काल जनतेला शुभेच्छा दिल्या. 

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसंच नागरिकांना स्वदेशी उत्पादनं वापरण्याचं आवाहन केलं. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा आदर आणि शाश्वत शेतीसारख्या जीवनमूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचा संदेश त्यांनी दिला. 

अयोध्येत आज दीपोत्सव साजरा होत आहे. शरयू नदीच्या 56 घाटांवर सुमारे 26 लाख दिवे उजळणार असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.   

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.