धनगर आरक्षण प्रश्नी उद्या मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याकरता परवानगी मागणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला.
गेल्या वर्षी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनात उपोषणादरम्यान मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख करत न्यायालयानं सांगितलं की, त्यांनीही एका दिवसासाठी परवानगी मागितली होती, मात्र ते सहा दिवस थांबून राहिले. आंदोलकांनी व्यापलेला भाग त्यांनी जाण्यापूर्वी स्वच्छ करावा असं सांगितलेलं असतानाही तो स्वच्छ न करता ते निघून गेले आणि महानगरपालिकेला ते काम करावं लागलं. त्यामुळे तातडीनं सुनावणी होणार नाही, आंदोलन कधीही करता येईल, असं न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावलं.
या याचिकेवर येत्या २८ तारखेला सुनावणी होईल.