डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षा भूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला तो दिवस होता १४ ऑक्टोबर १९५६, विजयादशमी.
विजयादशमीला धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा केला जातो. आज तारखेनुसार या घटनेचा वर्धापन दिन असल्याने आजही दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने येत आहेत. दीक्षाभूमी परिसरात विविध मूर्ती पुस्तकांचे स्टॉल लागलेले आहेत.
नागपूरच्या काटोल रोड वर डॉ . बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय शांतिवन इथं आज सुगम संध्या तसंच बुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं आहे, तसंच बाबासाहेबांचा जीवन प्रवास दाखवणारं चित्र प्रदर्शन देखील भरलं आहे.