६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज नागपूरमध्ये साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत. यानिमित्त आज सकाळी विशेष बुद्ध वंदना झाली. यावेळी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी अनुयायांसोबत बुद्ध वंदनेत सहभाग घेतला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या २२ प्रतिज्ञा देखील भन्ते ससाई यांच्यासोबत अनुयायांनी ग्रहण केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज नागपुरात कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलमधल्या बुद्ध वंदनेत सहभागी झाले होते.