डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या मुख्य सोहळा होणार

नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. काल ३० सप्टेंबर पासूनच दिक्षाभूमीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनुयायांच्या सोयीकरिता नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, मध्य रेल्वे तसंच नागपूर मेट्रो रेल्वेने देखील सुविधा सुनिश्चित केल्या आहेत.