धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर – नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर – नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. पहिली विशेष गाडी नांदेड इथून एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता सुटेल, तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला १२ वाजून दहा मिनिटाला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तीन ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजता नागपूर इथून सुटेल आणि नांदेडला सकाळी ११ वाजता पोहोचेल.