वजनात एक टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात सोनं असलेल्या काही मिश्र धातूंच्या आयातीवर डीजीएफटी अर्थात परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने बंदी घातली आहे. एक टक्क्यापेक्षा जास्त सोनं असलेल्या पॅलेडियम, रोडियम आणि इरिडियम या मिश्रधातूंची आयात तात्काळ प्रतिबंधित करण्यात आल्याचं डीजीएफटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. मात्र पावडर स्वरुपात किंवा प्रक्रिया न केलेल्या स्वरुपातले पॅलेडियम, रोडियम, इरिडियम, ऑस्मियम आणि रुथेनियम या मिश्रधातूंच्या आयातीला मात्र परवानगी असेल. तसंच, अल्प प्रमाणात मिश्रण असलेल्या मौल्यवान धातूंच्या आयातीवरही त्यांनी बंदी घातली आहे.
Site Admin | June 20, 2025 2:03 PM | डीजीएफटी | मिश्र धातू
पॅलेडियम, रोडियम आणि इरिडियम या मिश्र धातूंच्या आयातीवर डीजीएफटीने घातली बंदी