सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘डीजीसीए’ अर्थात, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं विमानभाड्यांमध्ये होणाऱ्या बदलांचा आढावा घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ‘डीजीसीए’ला विशेषतः सणासुदीच्या काळात विमानभाड्यांवर लक्ष ठेवायचे, तसंच दरांमध्ये अतिरिक्त वाढ झाली तर योग्य ती पावलं उचलायचे निर्देश दिले आहेत.
‘डीजीसीए’नं यासंदर्भात विमान कंपन्यांशी चर्चा करून सणासुदीच्या काळात भाडेवाढ नियंत्रणात ठेवण्याकरता वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, अतिरिक्त उड्डाणं सुरू करून विमानसेवेची क्षमता वाढवावी, असे निर्देश विमान कंपन्यांना दिले आहेत.