डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जालना जिल्ह्यात भाविकांच्या गाडीला अपघात

जालना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून सात जणांचा मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारीकरून जालना इथं परतत असतांना, काल संध्याकाळी जालना-राजूर मार्गावर तुपेवाडी फाट्याजवळ खडेश्वर बाबा मंदिर परिसरात या जीपची एका दुचाकीशी धडक झाली, त्यानंतर ही जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून हा अपघात झालामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून या अपघाताची माहिती घेतली. मयत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.