डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राहुल गांधी काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून अतिडावे बनल्याची फडणवीसांची टिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती अर्बन नक्षलींचा गराडा पडल्यामुळे ते आता काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून, अतिडावे बनल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज एका मुलाखतीमध्‍ये बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या कव्‍हरमध्‍ये असते, मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगाचं कव्‍हर घातलेली का दाखवतात, असा प्रश्नही त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्‍या १८० संघटना विध्‍वंसक कृत्‍यात सहभागी असणाऱ्या होत्‍या, असा आरोपही फडणवीस यांनी केला.