डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही – देवेंद्र फडणवीस

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारं सरकार असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पालघर जिल्ह्यात डहाणूत ते प्रचारसभेत बोलत होते. वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात खोटा प्रचार करून विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जल, जमीन आणि जंगलाचे रक्षण करण्याचं आश्वासन त्यांनी आदिवासींना दिलं. पालघरमध्ये विमानतळाची मागणी प्रधानमंत्री नरेेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहे. वाढवण बंदर, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन यासारख्या प्रकल्पांमुळं पालघर विकासाच्या केंद्रस्थानी येणार असल्याचं ते म्हणाले. 

पेणमध्ये बोलताना त्यांनी नमो शेतकरी सम्मान निधीच्या हप्त्यात वाढ, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि २४ तास मोफत वीज यासारखी आश्वासन दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.