डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यभरातल्या ३ हजार तीनशेहून अधिक धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यभरातल्या एकंदर ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आत्तापर्यंत हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेदरम्यान दिली. मुंबईत १ हजार ६०० हून अधिक ठिकाणचे भोंगे हटवले आहेत.

 

ही कारवाई सामंजस्याने, धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता केल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं. हटवलेले भोंगे पुन्हा लावले तर तिथल्या पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा