मुंबईत भाजपाला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्या शिवसेनेला गेल्या तीन निवडणुकांमध्येही मिळाल्या नव्हत्या. आता मुंबईचा महापौर कोण होणार हे शिवसेनेसोबत बसून ठरवणार आहोत, त्यात काहीही वाद नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. मुंबईला जगातलं सर्वोत्तम शहर म्हणून प्रस्थापित करायचं भाजपाचं ध्येय आहे. एकही मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही, गरीबांना घर देण्याचं धोरण भाजपा राबवणार असल्याचं ते म्हणाले.
सगळे आडाखे मागे सारून भाजपला जो विजय पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिला आहे, त्या विजयाने जबाबदारीचं भान वाढलं आहे. कारण जनतेने विकासावर, भाजपच्या कार्यप्रणालीवर दाखवलेला हा विश्वास आहे. या विश्वासाला पात्र होण्याकरता जास्त मेहनत करावी लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Site Admin | January 17, 2026 7:14 PM | CM Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंचा पक्ष मुंबईच्या महापौर पदासाठी आशावादी तर महायुतीचा महापौर होणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त