डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झाले. फणसळकर यांनी ३० जून २०२२ रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. 

 

फणसळकर यांच्या जागी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ५३ वर्षांचे भारती १९९४ च्या तुकडीतले अधिकारी आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त या पदावर त्यांनी काम केलं आहे. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा तपास करणाऱ्या दहशतवादी विरोधी पथकाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.