पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून आखावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होते. राज्याच्या विकासाची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन नियोजित वेळेत दर्जेदार पणे पूर्ण व्हावीत यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीला विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Site Admin | July 2, 2025 3:07 PM | ajit pawar | DCM Ajit Pawar
पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून आखावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार
