नागपूरसाठी १२०० कोटींहून जास्त निधीचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यासाठी बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा विकास आराखडा जिल्हा नियोजन विकास बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार कोटीपेक्षा जास्त मूल्याची कामं राज्य शासनाच्या वतीने करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. नागपूर शहरात सगळीकडे विकासकामं सुरू असल्याने खोदकाम आणि वाहतूक वळवण्यात आल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, पण ही कामं वेगाने पूर्ण करू, असं आश्वासनही फडनवीस यांनी दिलं.