डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे – केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे

विकसित भारत योजनेमध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग अपेक्षित आहे; सशक्त आणि सुरक्षित देशाच्या निर्मितीसाठी युवा पिढीचा हातभार लागावा, अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी काल पुण्यात व्यक्त केली. ‘माय भारत‌’च्या माध्यमातून युवा पिढीने राजकारणाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करावी; असंही त्यांनी सूचित केलं. विश्वकर्मा इन्स्ट्यिटूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं ‘विकसित भारत ॲम्बॅसेडर युवा कनेक्ट’ उपक्रमा अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुण्यातील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातही काल खडसे यांच्या उपस्थितीत युवा कनेक्ट उपक्रम झाला. यावेळी, एक पेड मां के नाम; या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या आवारात रक्षा खडसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.