इतिहाससंशोधक, प्रा. मा. म. देशमुख यांचं आज नागपूर इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. इतिहासाचं धाडसी पुनरावलोकन करत त्यांनी शिवकाळातले अनेक महत्त्वाचे मुद्दे समाजासमोर मांडले. “मध्ययुगीन भारताचा इतिहास” हा त्यांचा ग्रंथ विशेष गाजला.
शिवराज्य, शिवशाही, प्राचीन भारताचा इतिहास, बहुजन समाज आणि परिवर्तन, बौद्ध धम्म आणि शिवधर्म, अभिनव अभिरूप, अभ्यास असा करावा, जय जिजाऊ, मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा, युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा, वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य, राष्ट्रनिर्माते, सन्मार्ग, समाज प्रबोधन, साहित्यिकांची जबाबदारी इत्यादी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत ते सक्रीय होते.