डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यात महायुती ही विचारांची युती असून महायुतीत कोणताही बेबनाव नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता, महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नयेत, मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकानं घ्यावी, असा निरोप पक्षाकडून धंगेकरांना दिला असल्याचं शिंदे म्हणाले.