डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचं अपघाती विमा कवच लागू करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली. सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर या महिन्यापासून ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी १२ महिन्यांसाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. स्वच्छतागृह, विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य देणं तसंच, एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचं आवाहनही शिंदे यांनी यावेळी केलं.