ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचं उद्घाटन आज ठाण्याच्या कोरस आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या अभियानाअंतर्गत पुढच्या ३ महिन्यात ५ लाख महिलांची वैद्यकीय तपासणी विनामूल्य करण्यात येणार आहे. विशेषतः गर्भाशयमुखाचा कर्करोग, मधुमेह, हिमोग्लोबिन या तपासण्या या अभियानात होणार असून ९ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी एचपीव्ही लस उपलब्ध असेल. गर्भाशय मुख कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक साधनसामुग्रीकरता नगरविकास विभाग ठाणे महानगरपालिकेला ५ कोटी रुपये देणार असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला प्रतिष्ठानने या उपक्रमाला हातभार लावला आहे.