डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील. हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे तेच ठरवतील, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.