नागपूर : आशा स्वयंसेविकांना मोबाईल फोनचं वितरण

नागपूरमध्ये १३ तालुक्यातल्या आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मोबाइल फोनचं वितरण केलं. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठानच्या सौजन्यानं आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या्ानाल्ीो माध्यमातून अधिक सक्षमीकरणाचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत १ हजार ९१० आशा सेविकांना मोबाईल फोन दिले जाणार आहेत. यानिमीत्त देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.