सरकार आल्यावर चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी रुपये देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महायुती सरकारनं राज्यात अनेक समाजोपयोगी योजना आणल्या असं सांगत सरकार आल्यावर चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी रुपये देऊ, असं आश्वासन भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
चंद्रपूर इथं प्रचारसभेत ते बोलत होते. महिला आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.