डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 15, 2024 6:43 PM | Devendra Fadnavis

printer

कोराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरजवळच्या कोराडी तालुका क्रीडा संकुल सुविधांचं लोकार्पण आणि हर घर तिरंगा अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळयात बोलत होते. कोराडीच्या या तालुका क्रीडा संकुलाचं वीरांगना राणी अवंतीबाई असं नामकरण या समारंभात करण्यात आलं.

 

या क्रीडासंकुलात बॉक्सींग, टेबल टेनीस, फेन्सींग, कुस्ती, जिम्नॉस्टिक, बॅलन्सींग बिम, ट्रायो ॲक्रोबॅटीक्स, रोमन रिंग, योगा आदी विविध प्रकारच्या खेळाच्या सुविधा उपलब्ध आहेत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.