डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातल्या धर्मादाय कार्यालयाचं काम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

राज्यातल्या  धर्मादाय कार्यालयाचं काम कौतुकास्पद असून या विभागानं अधिकाधिक लोकाभिमुख कामं करावीत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली आणि रुग्णांकरता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचं  उद्घाटन आज फडनवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या  शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा मोफत आणि सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष समन्वयानं काम करत आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयातल्या कागदपत्रांचं  स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन या उपक्रमामुळे हे काम  अधिक सुकर होऊन त्यात  वेग आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री वैद्यकीय  सुविधा सहायता हेल्पलाईन विषयीची माहिती १८०० १२३ २२११ या क्रमांकावर २४ तास उपलब्ध होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.