डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्तीसाठी समान धोरण राबवण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ज्या कोर्स केल्यामुळे मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर एक तर उभं राहता येईल, स्टार्टअप्स मध्ये त्याला काहीतरी स्वतःचा उद्योग सुरु करता येईल किंवा त्यांना नोकरी मिळेल. अशा प्रकारच्या कोर्स ला सभापती महोदय मी जरी सारथीच्या बद्दल उत्तर देत असलो तर साधारण राज्य सरकारचं सारथी, बार्टी, महाज्योती या सगळ्याच्या बाबतीमध्ये तीच भूमिका आहे. कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनींच्यावर अन्याय होणार नाही. ही पण काळजी आम्ही घेतोय. परदेशात पण मुलांना मुलींना पाठवत असताना कुठल्या कुठल्या कोर्स करता पाठवायचं, त्याची पण संख्या आम्ही ठरवलेली आहे. अशा प्रकारचं साधारण धोरण राज्य सरकारने स्वीकारलेलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा