डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 6, 2024 6:42 PM | DCM Ajit Pawar

printer

आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी नागेपल्लीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.