डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याप्रकरणी कुणालाही माफी नाही, कारवाई होणारच, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत बोलत होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

अजित पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.