January 20, 2025 1:04 PM

printer

संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त टपाल विभागातर्फे कार्यक्रमाचं आयोजन

भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या अमृतमहोत्सवानिमित्त टपाल विभाग आज नवी दिल्लीत तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. राष्ट्रीय फिलाटेलिक संग्रहालयात होणाऱ्या या महोत्सवात सर्व वयोगटातील अभ्यागतांसाठी विविध उपक्रम असतील. यामध्ये प्रदर्शन, प्रश्नमंजुषा, पोस्टल सफारी आणि पत्रलेखन स्पर्धा यांचा समावेश आहे. संविधानात

नमूद केलेल्या मूल्यांना उजाळा देणं आणि एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना बळकट करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं दळणवळण मंत्रालयानं म्हटलं आहे.